IPL 2018 : हैदराबादचे कोलकातासमोर 175 धावांचे आव्हान

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा : क्‍वालिफायर-2 सामना
कोलकाता – वृद्धिमान साहा आणि शिखर धवन यांची वेगवान सलामी आणि रशीद खानची झंझावाती खेळी यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील क्‍वालिफायर-2 सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवता आले.

अंतिम फेरीतील स्थानासाठी निर्णायक असलेल्या या लढतीत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदा फलंदजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 174 धावांची मजल मारली. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचणार असून पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने याआधीच अंतिम फेरी गाठली आहे.

या सामन्यासाठी संघात परतलेल्या वृद्धिमान साहाने 27 चेंडूंत 5 चौकारांसह 35 धावांची खेळी करताना शिखर धवनच्या साथीत हैदराबादला 7.1 षटकांत 56 धावांची सलामी दिली. शिखर धवनने 24 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 34 धावा केल्या. परंतु कुलदीप यादवने आठव्या षटकांत शिखर धवन आणि केन विल्यमसन (3) हे दोन खंदे फलंदाज तंबूत परतविताना हैदराबादला हादरा दिला.

हैदराबादने 20 षटकांत 2 बाद 79 धावा केल्या होत्या. वृद्धिमान साहाला बाद करून पियुष चावलाने कोलकाताला तिसरे यश लवकरच मिळवून दिले. परंतु शकिब अल हसनने दीपक हूडाच्या साथीत हैदराबादला 14व्या षटकांत 100 धावांचा टप्पा पार करून दिला. दरम्यान कुलदीपने शकिबला धावबाद करून कोलकाताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. शकिबने 24 चेंडूंत 4 चौकारांसह 28 धावा केल्या.

दीपक हूडाने 19 चेंडूंत 1 षटकारासह 19 धावा केल्या. अखेर सुनील नारायणने त्याची झुंज संपुष्टात आणली. ब्रेथवेट (8) धावबाद झाला व पाठोपाठ शिवम मावीने युसूफ पठाणला परतवीत हैदराबादची 7 बाद 138 अशी घसरगुंडी घडवून आणली. परंतु रशीद खानने केवळ 10 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 34 धावा फटकावताना भुवनेश्‍वर कुमारच्या (नाबाद 5) साथीत 1.5 षटकांत 36 धावांची अखंडित भागीदारी करीत हैदराबादला 174 धावांची मजल मारून दिली.

तत्पूर्वी आजच्या सामन्यासाठी कोलकाताने एकमेव बदल करताना जेव्हन सीअरलेसच्या जागी युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी याचा संघात समावेश केला. तर हैदराबाद संघाने मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी आणि संदीप शर्मा यांना विश्रांती देताना वृद्धिमान साहा, दीपक हूडा आणि खलील अहमद यांना संधी दिली.

संक्षिप्त धावफलक-
सनरायजर्स हैदराबाद- 20 षटकांत 7 बाद 174 (रशीद खान नाबाद 34, वृद्धिमान साहा 35, शिखर धवन 34, शकिब अल हसन 28, केन विल्यमसन 3, कुलदीप यादव 29-2, सुनील नारायण 24-1, पियुष चावला 22-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)