IPL 2018 : हैदराबादचा राजस्थानवर 11 धावांनी विजय

जयपुर -आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सनरायजर्स हैदराबादच्या संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा 11 धावांनी पराभव करत गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.

नाणेफेक जिंकून  प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या संघाने निर्धारीत 20 षटकांत सात गडी गमावत राजस्थान समोर 152 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाला निर्धारीत 20 षटकांत सहा गडी बाद 140 धावाच करता आल्या, यावेळी एक बाजू लावून धरत 53 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्‍य रहाणेची एकाकी झुंज अपयशी ठरली.

-Ads-

यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाची   दाणादाण उडवणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी आज पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. 151 धावांच्या माफक लक्ष्याचा बचाव करताना हैदराबादच्या गोलंदाजांनी राजस्थानला 140 धावांत रोखत संघाला 11 धावांनी विजय मिळवून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
121 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
4 :joy: Joy
5 :heart_eyes: Awesome
6 :blush: Great
4 :cry: Sad
8 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)