IPL 2018 : हैदराबादचा राजस्थानवर 11 धावांनी विजय

जयपुर – आयपीएलच्या आकराव्या मोसमात आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सनरायजर्स हैदराबच्या संघाने राजस्थान रॉयल्सच्या संघाचा 11 धावा आणि तीन गडी राखुन पराभव करत गुणतालीकेत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.

नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या संघाने निर्धारीत 20 षटकांत सात गडी गमावत 151 धावा करत राजस्थान समोर 152 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना राजस्थानच्या संघाला निर्धारीत 20 षटकांत सहागडी बाद 140 धावाच करता आल्या, यावेळी एक बाजू लावून धरत 53 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी करणाऱ्या अजिंक्‍य रहाणेची एकाकी झुंज अपयशी ठरली.

यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी आज पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. 151 धावांच्या माफक लक्ष्याचा बचाव करताना हैदराबादच्या गोलंदाजांनी राजस्थानला 140 धावांत रोखत संघाला 11 धावांनी विजय मिळवून दिला. 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला सुरुवातीलाच धक्का बसला.

संदीप शर्माने राहुल त्रिपाठीचा तिफळा उडवत हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आलेल्या संजु सॅमसन आणि सलामीवीर रहाणे यांनी 7.2 षटकात 59 धावांची भागीदारी करत संघाचा धावफलक हालता ठेवला. यावेळी सॅमसनने 30 चेंडूंचा सामना करताना तिन चौकार आणि एका षतकाराच्या मदतीने 40 धावा फटकावल्या. सॅमसन बाद झाल्यानंतर रहाणेने एकाबाजुने किल्ला लढवत झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली. यावेळी हैदराबाद कडून सिद्धर्थ कौलने दोन गडी बाद केले तर संदीप शर्मा, बसिल थंपी, रशीद खान आणि युसुफ पठान यांनी प्रत्येकी एका गड्याला बाद केले.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना अखेरच्या षटकांमध्ये राजस्थानच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे सनराईजर्स हैदराबादचा संघ पुन्हा एकदा ढेपाळला. कर्णधार केन विल्यमसन व सलामीवीर ऍलेक्‍स हेल्स यांच्यात झालेल्या 92 धावांच्या भागीदारीनंतर सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिल्यामुळे हैदराबादला 20 षटकांत 151 धावांपर्यंत मजल मारता आली. शिखर धवन माघारी परतल्यानंतर कर्णधार विल्यमसन आणि हेल्स जोडीने संघाचा डाव सावरला होता.

यावेळी हेल्सने 39 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारांच्या मदतीने 45 धावा फटकावल्या तर कर्णधार विल्यम्सनने 43 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार लगावत 63 धावांची खेळी साकारली. हे दोन्ही फलंदाज मैदानात असताना हैदराबादचा संघ आज मोठी धावसंख्या उभारेल असा अंदाज सर्वांनीच व्यक्त केला होता. पण हेल्स आणि विल्यम्सन माघारी परतल्यानंतर हैदराबादची फलंदाजी कोलमडली. जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. त्यामुळे एका क्षणापर्यंत 180-200 धावसंख्या गाठु शकणारा हैदराबादचा डाव 151 धावांमध्ये आटोपला.

राजस्थानच्या गोलंदाजांनी सामन्यात दमदार पुनरागमन करत हैदराबादच्या फलंदाजांना वेसण घातली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 3 तर कृष्णप्पा गौथमने 2 बळी घेतले. या दोघांना जयदेव उनाडकट आणि इश सोधी यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक – सनरायजर्स हैदराबाद 20 षटकात 7 बाद 151 (ऍलेक्‍स हेल्स 45, केन विल्यम्सन 63, जोफ्रा आर्चर 26-3, क्रिश्‍नप्पा गौथम 18-2) विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स 20 षटकात 6 बाद 140 (अजिंक्‍य रहाणे 65, संजु सॅमसन 40, सिद्धार्थ कौल 23-2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)