IPL 2018 : हैदराबादचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निर्णय

जयपूर : सलग दोन पराभवांनंतर मुंबईवरील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या राजस्थान रॉयल्स संघासमोर आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील आज रंगणाऱ्या लढतीत चमकदार कामगिरी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाचे कडवे आव्हान आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-

हैदराबादने गेल्या सातपैकी पाच सामने जिंकून 10 गुणांसह दुसरे स्थान राखले आहे. तर राजस्थान संघ 3 विजय व 3 पराभवांसह पाचव्या क्रमांकावर स्थिरावला आहे. सलग दोन पराभवांनंतर राजस्थानची वाटचाल धोक्‍यातच आली होती. परंतु कृष्णाप्पा गौतमने अफलातून खेळी करताना मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून दिल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)