IPL 2018 : सनरायजर्स हैदराबाद संघाचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

कोलकाता – आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघासमोर आज  कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असणार आहे. दरम्यान आजच्या या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाताने पहिल्या सामन्यात बंगळुरूवर एकतर्फी मात केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. तर दुसरीकडे हैदराबादच्या गोलंदाजांनी आपल्या दोन्ही सामन्यात धावा रोखण्याचे काम चोख बजावले होते. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करताना आपल्या संघाला 9 गडी राखून विजय मिळवून दिला होता. मात्र मुंबईविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या काही षटकांमध्ये मधली फळी कोलमडल्याने त्यांना संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे हैदराबादला आपल्या मधल्या फळीतील फलंदाजांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)