IPL 2018 : षटकांच्या संथ गतीमुळे कोहलीला 12 लाख दंड

बंगळुरू – चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध आयपीएलच्या 11व्या मोसमातील दुसरा पराभव पत्करल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे स्पर्धेतील आव्हान धोक्‍यात आले आहे. परंतु सहा सामन्यांत केवळ 4 गुणांची कमाई करता आल्यामुळे गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असलेल्या बंगळुरूसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करताना षटकांची गती निर्धारित वेळेपेक्षा संथ असल्यामुळे बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला तब्बल 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

यजमान बंगळुरू संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 205 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. परंतु अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग दोनीच्या झंझावाती फटकेबाजीमुळे चेन्नईने 5 बाद 207 धावा फटकावून रोमांचकारी विजयाची नोंद केली. बंगळुरू संघ आणि विराट कोहली यांचा या मोसमातील हा पहिलाच नियमभंग असल्यामुळे त्याला किमान शिक्षा देण्यात आली असल्याचे आयपीएलच्या संयोजन समितीने जाहीर केले. विराटने आपली चूक मान्य करून शिक्षा स्वीकारल्यामुळे या प्रकरणी औपचारिक चौकशी करण्यात आली नाही.

 सिद्धार्थ कौलला ताकीद

त्याआधी झालेल्या साखळी सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने मुंबईविरुद्ध हैदराबादला चमकदार विजय मिळवून देणारा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याला ताकीद देण्यात आली आहे. त्याच्याकडून नेमकी काय चूक घडली आहे याचा खुलासा केला गेला नसला तरी हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने हा आरोप स्वीकारला असून सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहील असे जाहीर केले.

सिद्धार्थ कौलनेही आपली चूक मान्य केली असून सामनाधिकाऱ्यांचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले. सिद्धार्थने स्तर 1 अंतर्गत नियम क्रमांक 2.1.4 चा भंग केल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान सिद्धार्थ कौलने मुंबईचा फलंदाज मयंक मार्कंडेला बाद केल्यानंतर त्याच्याकडे पाहून केलेल्या आक्षेपार्ह हावभावांमुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)