IPL 2018 : शेन वॉटसनने केलं आयपीएलमधलं तिसरं शतक

पुणे : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने शेन वॉटसनच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर 64 धावांनी सहज विजय मिळविला. या विजयासह चेन्नईने पदकतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर शेन वॉटसनने आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमातले दुसरे शतक ठोकले. वॉटसनने 57 चेंडूमध्ये 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने दमदार खेळी करीत 106 धावा बनविल्या. वॉटसनचे आयपीएलमधले हे आजवरचे तिसरे शतक ठरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)