IPL 2018 : विजयासाठी आसुसलेल्या मुंबईचा पहिला विजय…

मुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामात आपल्या पहिल्या तीनही सामन्यांत अखेरच्या क्षणी पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आज होणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान होते. हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करीत मुंबईने आपल्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आजच्या चौथ्या सामन्यात मुंबईची अग्निपरीक्षा होती परंतु, त्यांनी चांगल्या धावा बनवित बंगळुरुपुढे 214 धावांचे आव्हान उभे केले होते. मुंबई कडून खेळताना कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज खेळत ९४ धावांची खेळी करत आणि त्याला एविन लुईसने दिलेली साथ, या जोरावर मुंबईने चौथ्या सामन्यात बंगळुरुसमोर २१४ धावांचं आव्हान उभे केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक खेळीचा संघाला काहीही फायदा झाला नाही. त्याने 62 चेंडूमध्ये 92 धावा बनविल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)