IPL 2018 : वयापेक्षा तंदुरुस्तीला महत्त्व – महेंद्रसिंग धोनीचा निर्वाळा

मुंबई – आयपीएलमध्ये तिसरे विजेतेपद पटकावून चेन्नई सुपर किंग्जने मोठ्या दिमाखात पुनरागमन केले आहे. आयपीएल अकरापैकी आपली सातवी अंतिम फेरी खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक 3 वेळा विजेतेपद मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. चेन्नईच्या संघातले बहुतांश खेळाडू हे वयाची तिशी ओलांडलेले आहेत, त्यामुळे चेन्नईला आयपीएलमधला अनुभवी संघ म्हणून ओळखले जात आहे.

तसेच या संघातील अनेक प्रमुख खेळाडू िुतशी ओलांडलेले आहेत. परंतु सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात धोनीने आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल बोलत असताना टीकाकारांची तोंडे बंद केली. आपण खेळाडूंच्या वयाबद्दल प्रचंड चर्चा करतो, मात्र माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खेळाडूची तंदुरुस्ती. अंबाती रायडू आता 33 वर्षाचा आहे, मात्र मैदानात आजही तो एखाद्या तरुण खेळाडूसारखा खेळतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याचसोबत एखाद्या फलंदाजाला एकेरी-दुहेरी धावा घ्यायच्या नसतील, तर त्याला विचार करत बसावा लागत नाही. तो आपल्या फलंदाजीच्या शैलीत बदल करत त्यावेळी फटकेबाजी करतो. त्यामुळे माझ्या मते महत्त्वाच्या सामन्यात तुमचे वय तुमच्या खेळाच्या आड येत नाही, मैदानात तुमचा अनुभव बोलतो. आयपीएलचा अकरावा हंगाम जिंकल्यानंतर सध्या चेन्नई सुपर किंग्जचा सेलेब्रेशनचा कोणताही इरादा नसल्याचं धोनीने सांगितले. धोनी आणि संपूर्ण संघ आज चेन्नईला रवाना होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज मुंबई येथे संघाने तीन वेळा अंतिम सामन्यात सहभाग घेतला आणि तिन्ही वेळा चेन्नईच्या संघाने अंतिम सामना जिंकत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे वानखेडे स्टेडियमचे मैदान चेन्नईसाठी “लकी’ असल्याचे बोलले जात आहे. अर्थात या वेळी शेन वॉटसन हा चेन्नईसाठी तारणहार ठरला. परंतु याआधीची प्रत्येक वेळी कोणत्या तरी एका खेळाडूने चेन्नईला विजय मिळवून दिला आहे.

विजयासोबत वॉटसनने केली विक्रमांची नोंद
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात शेन वॉटसन हा संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. हैदराबादच्या आक्रमणाला तोंड देत आक्रमक फटकेबाजी करत वॉटसनने नाबाद शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वॉटसनने 57 चेंडूंत 11 चौकार आणि 8 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 117 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने काही विक्रमांचीही नोंद आपल्या नावावर केली.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करणारा वॉटसन दुसरा खेळाडू ठरला आहे. 2014 च्या हंगामात वृद्धिमान साहाने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना शतक झळकावले होतं. त्यानंतर यंदाच्या हंगामात अंतिम फेरीत वॉटसनने शतक झळकावले आहे. संपूर्ण आयपीएलमधलं वॉटसनचे हे चौथे, तर यंदाच्या हंगामातील दुसरे शतक ठरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर शेन वॉटसन फक्त टी-20 क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. यंदाच्या लिलावात चेन्नई सुपरकिंग्जने वॉटसनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. वॉटसननेही फलंदाजी व गोलंदाजीत सुरेख कामगिरी करत आपल्या संघाचा व कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आहे. अंतिम फेरीतल्या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीर किताब देऊनही गौरवण्यात आलं.

ऋषभ पंतला उदयोन्मुख खेळाडूचा सन्मान
आयपीएलचा अकरावा मोसम संपला असून यंदाच्या मोसमात सर्वच सामने रोमहर्षक ठरले. तसेच यंदाचा मोसम विदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंनी गाजवला. त्यातही लोकेश राहुल, ऋषभ पंत, कृष्णप्पा गौतम, इशान किशन, नितीश राणा, श्रेयस अय्यर, मयंक मार्कंडे यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यातील दिल्ली डेअर डेव्हिल्सचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला यंदाच्या मोसमातील सर्वोत्तमउदयोन्मुख खेळाडू या किताबा सन्मानित करण्यात आले आहे. त्याच बरोबर त्यालासर्वोत्तम शैलीदार खेळाडू हा देखील सन्मान देण्यात आला आहे.

सुनील नारायणला सुपर स्ट्रायकर आणि व्हॅल्युअबल प्लेयरचा किताब प्रदान करण्यात आला. तर यंदाच्या मोसमात 735 धावा करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला ऑरेंज कॅप प्रदान करण्यात आली. सर्वाधिक 24 बळी मिळवल्याबद्दल किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अँन्ड्रयू टायला पर्पल कॅप प्रदान करण्यात आली. ट्रेन्ट बोल्टला सर्वोत्तम झेल घेण्याच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. तर मुंबई इंडियन्स संघाला फेअर प्ले ऍवॉर्डने गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)