IPL 2018 : रोहीतच्या त्याखेळी साठी त्याला झाली अर्जुन तेंडूलकरची मदत

मुंबई – वानखेडेवर झालेल्या आपल्या चौथ्या लढतीत मुंबई इंडियन्सने हंगामातील पहिला विजय मिळवला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने 94 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पण यासाठी त्याला मदत केली ती मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरने.

सचिन हा मुंबईच्या संघाचा मुख्य मार्गदर्शक आहे. मुंबईच्या खेळाडूंना सचिन नेहमीच मार्गदर्शन करत असतो. पण सचिनचा मुलगा सराव करताना मुंबईच्या सर्व खेळाडूंना गोलंदाजी करतो, आणि त्याचबरोबर तो आयपीएलच्या संघाबरोबरही असतो. मुंबईचा वानखेडेवर चौथा सामना रंगण्यापूर्वी सारेच खेळाडू सराव करत होते. यावेळी रोहित शर्माला अर्जुन गोलंदाजी करत होता.

नेट्‌समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना फलंदाजांना काही अतिरीक्त गोलंदाजांची मदत लागते. त्यामुळे संघामध्ये नसलेले काही खेळाडू यावेळी गोलंदाजी करत असतात. या अतिरीक्त गोलंदाजांमध्ये अर्जुनचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो संघाच्या सराव सत्रात सहभागी असतो आणि सर्व फलंदाजांना गोलंदाजी करत असतो.

बंगळुरू सोबत झालेल्या सामन्यापुर्वीही त्याने रोहित शर्माला गोलंदाजी करत सराव केला. अर्जुनच्या वेगवान गोलंदाजी सोबत केलेल्या सरावाचा फायदा रोहितला सामन्यातही झाला. रोहितच्या नेत्रदीपक 94 धावांच्या खेळीवर मुंबईने हा सामना जिंकला. सध्याच्या घडीला मुंबईला पहिला विजय गवसला आहे. आता 22 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांचा सामना होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)