IPL 2018 : राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य

जयपूर : जयपूरमध्ये सुरु असलेल्या आजच्या आयपीएल सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान हैदराबादने निर्धारित २० षटकांमध्ये ७ बाद १५१ धावा करत राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य ठेवले. सनरायजर्स हैदराबादकडून कर्णधार  केन विल्यमसनने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. त्याने ४३ बॉलमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६३ धावा वसूल केल्या. तर ऍलेक्‍स हेल्सने ४५ धावा केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)