IPL 2018 : राजस्थानसमोर आज हैदराबादचे आव्हान

जयपूर – सलग दोन पराभवांनंतर मुंबईवरील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या राजस्थान रॉयल्स संघासमोर आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील आज रंगणाऱ्या लढतीत चमकदार कामगिरी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाचे कडवे आव्हान आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थानला आपल्यासमोरील आव्हानांची चांगलीच कल्पना आहे.

हैदराबादने गेल्या सातपैकी पाच सामने जिंकून 10 गुणांसह दुसरे स्थान राखले आहे. तर राजस्थान संघ 3 विजय व 3 पराभवांसह पाचव्या क्रमांकावर स्थिरावला आहे. सलग दोन पराभवांनंतर राजस्थानची वाटचाल धोक्‍यातच आली होती. परंतु कृष्णाप्पा गौतमने अफलातून खेळी करताना मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून दिल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.

आता मात्र अजिंक्‍य रहाणेनेही कर्णधाराला साजेशी कामगिरी करावी, अशी त्याच्या सहकाऱ्यांना अपेक्षा आहे. संजू सॅमसनने आपल्या फटकेबाजीची क्षमता दाखवून देत प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. तसेच बेन स्टोक्‍स व जोस बटलर यांच्यामुळे राजस्थानच्या फलंदाजीला बळ मिळाले आहे.

त्याउलट बॉल टॅम्परिंग प्रकरणात निलंबनाची शिक्षा झालेल्या डेव्हिड वॉर्नरच्या गैरहजेरीतही हैदराबादने जबरदस्त कामगिरी केली आहे. या दोन संगांमधील पहिल्या फेरीच्या लढतीत हैदराबादने 9 गडी राखून विजय मिळविला होता. त्याची परतफेड करण्यास राजस्थानचे खेळाडू उत्सुक असणार. परंतु शिखर धवन गेल्या काही सामन्यांतील अपयशाची भरपाई करण्यास सज्ज आहे.

तसेच केन विल्यमसन आणि मनीष पांडेसह युसूफ पठाण व दीपक हूडा यांच्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. रशीद खान व शकिब अल हसन या स्पिनर्ससह भुवनेश्‍वर कुमार, बेसिल थंपी व सिद्धार्थ कौल यांचा वेगवान माराही हैदराबादची ताकद दाखवून देणारा आहे. त्यामुळेच राजस्थान समोरील आव्हान खडतर आहे.

  प्रतिस्पर्धी संघ-

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), अंकित शर्मा, संजू सॅमसन, बेन स्टोक्‍स, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, डीआर्की शॉर्ट, दुश्‍मंथा चमीरा, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, एस. मिधुन, जयदेव उनाडकत, बेन लाफलिन, प्रशांत चोप्रा, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, जतिन सक्‍सेना, अनुरीत सिंग, आर्यमान बिर्ला, जोस बटलर, हेन्‍रिच क्‍लासेन, झहीर खान आणि राहुल त्रिपाठी.

सनरायजर्स हैदराबाद-  केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्‍वर कुमार, वृद्धिमान सहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठान, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बेसिल थंपी, टी.नटराजन, सचिन बेबी, बिपुल शर्मा, मेहेंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्‍स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शकीब अल हसन, मोहम्मद नबी व ख्रिस जॉर्डन.

सामन्याचे ठिकाण- जयपूर, सामन्याची वेळ- दुपारी 4 पासून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)