IPL 2018 : राजस्थानचा मुंबईवर 3 गडी राखून विजय

जयपुर – नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना मुंबईने निर्धारीत 20 षटकात सात गडी बाद 167 धावा करत,राजस्थान रॉयल्स समोर विजयासाठी 168 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र राजस्थान रॉयल्सने 7 गड्यांच्या मोबदल्यात 19.4 षटकांमध्ये 168 धावांचे लक्ष्य पूर्ण करताना, मुंबई इंडियन्सवर 3 गडी राखून विजय मिळवला.

-Ads-

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली त्यांचा सलामीवीर इविन लुईसला धवल कुलकर्णीने त्रिफळाचीत करत पहिल्याच षटकात मुंबईला झटका दिला. मात्र  यानंतर आलेला इशान किशन आणि सलामीवीर सुर्यकुमार यादवने राजस्थानच्या गोलंदाजांचा खरपुस समाचार घेत फटकेबाजी करायला सुरुवात केली. यादव आणि किशनने कोणतीही जोखीम न पत्करता मुंबईची धावगती वाढवली. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने राजस्थान समोर 168 धावांचे आव्हान ठेवले होते.मुंबई इंडियन्सच्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकांमध्ये 168 धावांचे लक्ष्य पूर्ण करत मुंबईवर विजय मिळवला. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 52 धावा केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)