IPL 2018 : मुंबई-दिल्ली पहिल्या विजयासाठी लढणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रंगणार सामना

मुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामातील आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात अखेरच्या क्षणी पराभव पत्करावा लागलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आज होणाऱ्या लढतीत आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असणाऱ्या दिल्लीचे आव्हान आहे.

आतापर्यंत या हंगामात मुंबई आणि दिल्ली या संघांना पहिल्या दोन्ही सामन्यांत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबईने या हंगामातील चेन्नई आणि हैदराबाद यांच्याविरुद्धचे आपले सामने अखेरच्या क्षणी गमावले आहेत. तर दिल्लीने आपले सामने अनुक्रमे पंजाब आणि राजस्थानविरुद्ध पराभव पत्करला आहे.

मुंबईने दोन्ही सामने अखेरच्या क्षणी गमावले आहेत. चेन्नईने पहिल्या सामन्यात 1 चेंडू राखून विजय मिळवला होता, तर हैदराबादने अखेरच्या चेंडूवर मुंबईला मात दिली होती. दुसरीकडे पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा एकतर्फी पराभव झाला होता, तर राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला डकवर्थ लुईस नियमानुसार 10 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे दोन्ही संघांना पहिल्या विजयासाठी गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सुधारणा करणे आवश्‍यक आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.

दिल्ली डेअरडेव्हिल्स – गौतम गंभीर (कर्णधार), रिशभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्‍सवेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल तवेतिया, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुन्रो, डॅनिअल ख्रिस्तियन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरतसिंग मान, आवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्षल पटेल, मनजोत कालरा, संदीप लामिचाने, सायन घोष.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)