IPL 2018 : मुंबई इंडियन्स 8 गडी राखून विजयी…

पुणे – सूर गवसलेल्या सुरेश रैनाची शानदार खेळी आणि त्याने अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनीच्या साथीत केलेल्या भागीदाऱ्यांमुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील 27व्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी 170 धावांचे आव्हान ठेवता आले होते.

मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 169 धावांची मजल मारली होती. 170 धावांचे आव्हान पार करीत मुंबई इंडियन्सने अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर 8 गडी राखून सहजरित्या विजय मिळविला.

मुंबईने केवळ आपले दोन फलंदाज गमावत 170 धावांचे आव्हान यशस्वीपणे पार केले. कर्णधार रोहित शर्माने 33 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्य़ा मदतीने नाबाद 56 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)