IPL 2018 : मुंबईने अतिरिक्त गोलंदाज खेळवायला हवा – हर्शा भोगले 

मुंबईने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्याच्या पार्श्‍वभूमीवर क्रिकेट समालोचक हर्शा भोगलेंनी एका न्युजपोर्टल वर लिहिलेल्या लेखात म्हंटले आहे की, चेन्नईविरुद्धच्या लढतीत फलंदाजीची बाजू मजबूत करण्यासाठी मुंबई इंडियन्सने एक गोलंदाज कमी खेळविला. त्यामुळे संघातील साशंकतेच्या भावनेची कल्पना आली. जेपी ड्युमिनी चांगला खेळाडू असून परिस्थितीनुरुप एक-दोन षटके गोलंदाजी करू शकतो, पण त्याला खेळविणे म्हणजे बेन कटिंगला आठव्या स्थानावर फलंदाजी करावे लागणे, असे होते.

माझ्या मते मुंबई इंडियन्ससाठी अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देणे चांगला पर्याय ठरला असता, विशेषत: ऍडम मिल्ने. पुढच्या टप्प्यात त्यांनी हा पर्याय वापरला तर मला आश्‍चर्य वाटणार नाही. तसेच पुढे लिहिताना ते म्हणाले की मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. या दोन्ही लढतींमध्ये रोहित शर्माचे योगदान महत्त्वाचे ठरले. याकडे दोन बाजूंनी बघता येईल. तुमच्या मॅचविनर खेळाडूने दोनदा तुम्हाला सामना जिंकून देणे चांगले आहे, पण फलंदाजी क्रमामध्ये तो खालच्या क्रमांकावर खेळणे चकित करणारे आहे

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)