IPL 2018 : मुंबईचे दिल्लीपुढे विजयासाठी १९५ धावांचे आव्हान

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या हंगामातील आपल्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स मैदानात उतरले आहेत. दरम्यान,मुंबई इंडियन्सने दिल्लीसमोर विजयासाठी १९५ धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि एविन लुईस यांनी धडाकेबाज फलंदाजी केली.

यात सूर्यकुमार यादव ५३ धावा,एविन लुईस ४८ आणि टी. राहुल याने ३६ धावा केल्या. या सर्वांच्या जोरावर मुंबईने २० षटकांत ७ बाद १९४ धावा केल्या. दरम्यान, आजच्या सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार गौतम गंभीर याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)