IPL 2018 : बलाढ्य पंजाब समोर आज दिल्लीचे आव्हान 

इंदौर -आयपीएलच्या अकराव्या हंगामात एकामागोमाग एक विजय संपादीत करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघासमोर आज हंगामात केवळ एक विजय मिळवून गुणतालिकेत अखेरच्या स्थानी असलेल्या दिल्लीचे आव्हान असणार आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली आणि पंजाब यांच्या दरम्यान हा दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्लीवर विजय मिळवला होता. त्या सामन्यानंतर पंजाबने एकुण पाच सामने खेळले असून या पाच सामन्यांपैकी पंजाबने 4 सामन्यात विजय मिळवला आहे तर एका सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर दिल्लीने देखील आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे, तर त्यांना चार वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

त्यातच यंदाच्या हंगामात पंजाबचे सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल धडाकेबाज कामगिरी करत असून दोघेही फॉर्मात आहेत. लोकेश राहुलने दिल्ली विरुद्धच्या पहिल्या सामन्यात केवळ 14 चेंडूत अर्धशतक झळकावत आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली होती तर ख्रिस गेलने हंगामात खेळलेल्या तीनही सामन्यापैकी दोन सामन्यात दोन अर्धशतक तर एका सामन्यात नाबाद शतक झळकावले आहे. त्यातच पंजाबचे गोलंदाजही उत्कृष्ठ कामगिरी करत असल्याने पंजाब गोलंदाजी आणि फलंदाजीद्वारे प्रतिस्पर्धी संघावर सहज विजय संपादन करण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे गेल आणि राहुलच्या फलंदाजी समोर दिल्लीच्या संघाचा टिकाव कश्‍या प्रकारे लागतो हे पहाणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे गौतम गंभीर, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्‍सवेल, ऋषभ पंत सारखे तगडे फलंदाज असतानाही दिल्लीच्या संघाला मालिकेत आता पर्यंत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यांच्या कडे नमन ओझा, पृथ्वी शॉ सारखे चांगले फलंदाज बेंचची शोभा वाढवताना दिसत आहेत तर गोलंदाजी मधे अमित मिश्रा, शहाबाज नदीम, मोहोम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, यांना अपेक्षीत कामगिरी करता आली नसल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या सामन्यात त्यांनी सम्तोल संघाची निवड करतानाच आपल्या फलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. तेंव्हाच त्यांना विजय मिळु शकेल.

प्रतिस्पर्धी संघ – 
दिल्ली डेअरडेव्हिल्स – गौतम गंभीर (कर्णधार), रिशभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्‍सवेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, शहाबाज नदीम, विजय शंकर, राहुल टवेटीया, मोहोम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुन्रो, डॅनिअल ख्रिच्शन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरत सिंग मान, अवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्शल पटेल, मन्जोत कालरा, संदीप लामिचाने, सयन घोश.
किंग्ज एलेवन पंजाब – रवीचंद्रन अश्‍विन (कर्णधार), अक्षर पटेल, के.एल.राहुल, अँडृ टाय, ऍरोन फिंच, मार्कस स्टोनिस, करुन नायर, मुजीब झारदान, अंकित सिंग राजपूत, डेव्हिड मिलर, मोहित शर्मा, बरिंदर सिंग सरन, युवराज सिंग, ख्रिस गेल, बेन ड्‌वारसिअस, अक्षदीप नाथ, मनोज तिवारी, मयंक अग्रवाल, मंझूर दर, प्रदीप साहु, मयंक डागर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)