IPL 2018 : बचावात्मक पवित्र्याचा तोटा – कुलदीप यादव

कोलकाताविरुद्ध पहिल्या फेरीच्या सामन्यात कुलदीप यादव सपशेल अपयशी ठरला होता. त्या अपयशातून धडा घेऊन त्याने दुसऱ्या सामन्यात आपल्या कामगिरी कमालीची सुधारणा केली आणि कोलकाताला विजय मिळवून दिला. पहिल्या सामन्यात आपल्याला बचावात्मक मानसिकतेचा फटका बसल्याचे सांगून कुलदीप म्हणाला की, मी काही धावा रोखणारा गोलंदाज नसून धावांचे मोल देऊन बळी घेणारा गोलंदाज आहे. परंतु त्या सामन्यात कोलकाताचे फलंदाज फटकेबाजी करीत असल्याचे पाहून माझ्या मनात धावा रोखण्याचा विचार आला आणि कदाचित तेथेच आमचा घात झाला. मी जेव्हा जेव्हा फलंदाजावर आक्रमण करतो, तेव्हा तेव्हा मला बळी मिळाले आहेत. परंतु त्या सामन्यांत मला याचा काही वेळ तरी विसर पडला होता. आता हैदराबादविरुद्ध अखेरच्या सामन्यात आम्हाला विजय मिळविणे आवश्‍यक आहे. त्याच दिशेने आम्ही विचार करीत आहोत.

जोस बटलरचा बळी माझ्यासाठी खास होता. एक तर बटलर सध्या तुफान फॉर्ममध्ये असल्याने तो बाद होणे हा सामन्याचा “टर्निंग पॉइंट’ ठरला. दुसरे म्हणजे तो आणखी 5 ते 10 षटके किला असता, तर राजस्थानने निश्‍चितच 180-190 धावांची मजल मारली असती. म्हणूनच माझ्यासाठी बटलरचा बळी सर्वात महत्त्वाचा होता. अर्थात अजिंक्‍य रहाणेला त्रिफळाबाद केल्यामुळेही माझा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला होता. – कुलदीप यादव 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)