IPL 2018 : बंगळुरूसमोर आज राजस्थानचे आव्हान

मोहाली – आयपीएलच्या अकराव्या हंगामात खराब सुरुवातीनंतर विजयाचे खाते उघडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर उद्या (रविवार) राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. तर उद्याच होणाऱ्या दुसऱ्या लढतीत चेन्नई व पंजाब झुंज रंगणार आहे. आयपीएलच्या चालू हंगामात बंगळुरू आणि राजस्थान संघांना आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थानने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खराब खेळाचे प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्यांनी हा सामना एकतर्फी गमावला होता. तर बंगळुरूला देखील कोलकाताविरुद्ध अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याने त्यांचा या सामन्यात दणदणीत पराभव झाला होता.

-Ads-

त्यानंतर बंगळुरू आणि राजस्थान या दोन्ही संघांनी आपापल्या दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे पंजाब आणि दिल्लीचा पराभव करत विजयी पुनरागमन केले. बंगळुरूने आपल्या दुसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघावर एकहाती वर्चस्व गाजवले. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करताना पंजाबला चांगल्या सुरुवातीनंतरही माफक धावसंख्येत रोखण्यात यश मिळवले होते. दुसरीकडे राजस्थानच्या फलंदाजांना आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. राजस्थानकडून केवळ कर्णधार अजिंक्‍य रहाणे आणि संजू सॅमसनला धावा करण्यात यश आले आहे. त्यामुळेच फलंदाजांच्या कामगिरीवरच त्यांचे भवितव्य अवलंबून राहील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)