IPL 2018 : बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

मुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामात आपल्या पहिल्या तीनही सामन्यांत अखेरच्या क्षणी पराभव पत्करलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आज होणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान असणार आहे. बंगळुरूने या मोसमात एक विजय व दोन पराभवांचा सामना केला आहे. दरम्यान बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या दहाव्या मोसमात विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सची नव्या मोसमात खराब सुरूवात झाली आहे. या मोसमात मुंबईकडे समतोल संघ असून देखील त्यांना प्रत्येक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई इंडियन्ससाठी पाच, सहा व सातव्या क्रमांकावरील खेळाडूंनी भरीव कामगिरी करणे महत्वाचे आहे. मुंबईकडून या क्रमांकावर अनुक्रमे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि कायरॉन पोलार्ड हे फलंदाजीस येतात. मात्र त्यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता येत नसल्याकारणाने मुंबईला ऐनवेळेस पराभवाला सामोरे जावे लागत आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)