IPL 2018 : पॅट कमिन्सच्या जागी ऍडम मिल्ने सामील

मुंबई  – आयपीएलच्या अकराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.आता त्याची जागा न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ऍडम मिल्ने याने घेतली आहे.पॅट कमिन्सच्या पाठीला फ्रॅक्‍चर झाले नसले, तरी त्याच्या कंबरेत सूज चढली असल्यामुळे त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.

त्यामुळे कमिन्स संपूर्ण हंगामासाठी संघाबाहेर गेला आहे. याचा फटका मुंबईला आपल्या पहिल्या तीनही सामन्यांत बसला. आता त्याची जागा मिल्ने याने घेतली. त्यामुळे मुंबईच्या संघासमोरील अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मिल्नेच्या रूपाने त्यांना आवश्‍यक असलेल्या जादा वेगवान गोलंदाजाची कमतरता भरून येणार आहे.

तत्पूर्वी, आयपीएलला प्रारंभ होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना कमिन्सच्या कंबरेला त्रास होऊ लागला होता. तेव्हा सूज चढल्याचेही दिसले होते, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे फिजिओ डेव्हिड बॅकली यांनी दिली. कमिन्सची दुखापत आणखी बळावू नये यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. परिणामी कमिन्सने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)