IPL 2018 : पावसामुळे खेळ थांबला, पंजाबच्या 8.2 षटकांत बिनबाद 96

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असणाऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. कोलकाताने दिलेल्या १९१ धावांचा पाठलाग करताना  पंजाबच्या 8.2 षटकांत बिनबाद 96 धावा झाल्या आहेत.

दरम्यान, कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पंजाबकडून लोकेश राहुल आणि ख्रिस गेलने डावाची सुरुवात केली. दरम्यान, लोकेश राहुलने शिवम मावीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत झोकात सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवरही राहुलने चैकार लगावला.आंद्रे रसेलच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या दोन्ही चेंडूंवरही राहुलने चौकार वसूल केले. रसेलच्या दुसऱ्या षटकात गेलने चौकारासह आपल्या धावांचे खाते उघडले. दरम्यान, गेलने धावांच्या डोंगर उभा करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यातच पावसाने अडथळा निर्माण केला. खेळ थांबला त्यावेळी गेल २७ चेंडूत ४९ धावा आणि लोकेश राहुल २३ चेंडूत ४३ धावांवर खेळत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)