IPL 2018 : पंजाबचे बंगळुरूसमोर 156 धावांचे आव्हान

बंगळुरू  – लोकेश राहुल आणि करुण नायर यांच्या उपयुक्‍त योगदानानंतर कर्णधार रविचंद्रन अश्‍विनने केलेल्या झुंजार खेळीमुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आठव्या साखळी सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासमोर विजयासाठी 156 धावांचे आव्हान ठेवता आले.

बंगळुरूने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून देताना पंजाबचा डाव 19.2 षटकांत सर्वबाद 155 धावांवर रोखला. मयंक आगरवाल (15), ऍरॉन फिंच (0) आणि युवराज सिंग (4) यांना एकाच षटकांत बाद करून उमेश यादवने पंजाबची 3 बाद 36 अशी अवस्था केली.

मात्र लोकेश राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारासह 47 धावांची खेळी करताना करुण नायरच्या (29) साथीत चौथ्या विकेटसाठी 7.1 षटकांत 58 धावांची भागीदारी करीत पंजाबचा डाव सावरला. स्टॉईनिस (11), अक्षर पटेल (2) व अँड्रयू टाय (7) अपयशी ठरल्याने पंजाबचा डाव पुन्हा घसरला. परंतु अश्‍विनने केवळ 21 चेंडूंत 3 चौकार व 1 षठकारासह 33 धावांची खेळी करीत पंजाबला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. बंगळुरूकडून उमेश यादवने 23 धावांत 3 बळी घेतले. तर ख्रिस वोक्‍स, खेजरोलिया व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)