IPL 2018 : पंजाबचे दिल्लीसमोर 144 धावांचे आव्हान

नवी दिल्ली  – करुण नायर, लोकेश राहुल आणि मयंक आगरवाल यांच्या छोट्या, परंतु उपयुक्‍त डावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासमोर विजयासाठी 144 धावांचे आव्हान ठेवता आले. पदार्पण करणाऱ्या लियाम प्लन्केटने केवळ 17 धावांत 3 बळी घेतले. तर आवेश खानने 36 धावांत 2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी पाचारण केलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची वेगवान गोलंदाज लियाम प्लन्केटच्या भेदक माऱ्यासमोर दाणादाण उडाली व त्यांचा डाव निर्धारित 20 षटकांत 8 बाद 143 धावांवर रोखला गेला. धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलच्या गैरहजेरीत पंजाब संघाची फलंदाजी अपयशी ठरली.

-Ads-

बदली सलामीवीर ऍरॉन फिंच केवळ 2 धावांवर परतल्यावर लोकेश राहुलने 15 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 23 धावा करताना मयंक आगरवालच्या (16 चेंडूंत 21) साथीत 36 धावांची भर घातली. मयंकपाठोपाठ युवराजसिंगही (14) अपयशी ठरल्यानंतर करुण नायरने 32 चेंडूंत 4 चौकारांसह 34 धावा करताना 3.3 षटकांत 31 धावांची वेगवान भागीदारी केली.

राहुल व मयंक आगरवालला बाद करणाऱ्या प्लन्केटने करुण नायरलाही परतविले. तर ख्रिस्तियनने मिलरला (19 चेंडूंत 26) बाद करीत पंजाबची 6 बाद 127 अशी घसरगुंडी घडवून आणली. आवेश खानने ऍरॉन फिंच आणि युवराज सिंग यांना तंबूचा रस्ता दाखविला. अखेरच्या षटकांत पंजाबला अश्‍विनचा बळी गमावून केवळ 4 धावांची भर घालता आली.

संक्षिप्त धावफलक-

किंग्ज इलेव्हन पंजाब- 20 षटकांत 8 बाद 143 (करुण नायर 34, डेव्हिड मिलर 26, लोकेश राहुल 23, मयंक आगरवाल 21, लियाम प्लन्केट 17-3, आवेश खान 36-2)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)