मोहाली – 198 धावांचे आव्हान घेऊन पाठलाग करणाऱ्या चेन्नईला निर्धारित 20 षटकात पाच बाद 193 धावाच करता आल्याने पंजाबने सामना केवळ 4 धावांनी जिंकला. 198 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. त्यांचे पहिले तीन फलंदाज केवळ 39 धावांमध्येच तंबूत परतले. मात्र अंबाती रायडूने (49) एक बाजु लाऊन धरत चेन्नईचा धावफलक हालता ठेवला. त्याने धोनीच्या साथीत 57 धावांची भागीदारी केली. 12 चेंडूत 33 धावा रहिल्या असताना धोनीने 19 व्या षटकात 19 धावा वसूल केल्या. मात्र अंतिम षटकात 17 धावांची गरज असताना चेन्नईला केवळ 13 धावाच करता आल्यने त्यांनी हा सामना गमावला. धोनीने सहा चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 79 धावा फटकावल्या.
तत्पुर्वी, यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या ख्रिस गेलने आज महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. त्याने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 33 चेंडूंमध्ये 63 धावांची धडाकेबाज खेळी केली. अखेर शेन वॉट्सनने गेलला इम्रान ताहीरकरवी झेलबाद केले. गेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान ठेवले होते.
A nail biting finish here at Mohali.#KXIP win by 4 runs#KXIPvCSK pic.twitter.com/V3eNMun1DD
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2018
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा