IPL 2018 : नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पुणे – नव्या “होम ग्राऊंड’वर विजयी सलामीसाठी उत्सुक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर आज रंगणाऱ्या  लढतीत राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान आहे. या आधीच्या सामन्यांत दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागला असल्याने पुण्यात होणाऱ्या या सामन्यातून विजयपथावर पुनरागमन करण्यासाठी उभय संघ उत्सुक आहेत. दरम्यान  राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

-Ads-

मोसमाच्या प्रारंभीच अनेक चढ-उतारांचा सामना केल्यानंतर गुणतालिकेत चेन्नई चौथ्या तर राजस्थान पाचव्या स्थानी आहे. दोन्ही संघांचे 4 गुण असून चेन्नईने आपल्या पहिल्या तीन सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थानने हंगामात चार सामने खेळले असून, यातील दोन सामन्यात त्यांनी विजय मिळाला आहे तर दोन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)