IPL 2018 : नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा चेन्नईचा निर्णय

बंगळुरू –  दर्जेदार खेळाडू संघात असूनही कामगिरीत सातत्य नसल्यामुळे अनेकदा पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आयपीएलच्या अकराव्या हंगामातील आज रंगणाऱ्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे आव्हान आहे. दरम्यान चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

चेन्नईने बंगळुरूवर आतापर्यंत  13 सामन्यांत विजय मिळविला असून केवळ 7 पराभव पत्करले आहेत. मात्र चिन्नास्वामी स्टेडियमवरील आकडेवारीत दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकले आहेत.चालू हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार असून, आतापर्यंत मालिकेत चेन्नईने चार सामन्यांत विजय मिळवला असून, त्यांचा एका सामन्यात पराभव झाला आहे. बंगळुरूने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे तर तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)