IPL 2018 : नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा चेन्नईचा निर्णय

मोहाली – हंगामातील आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर आज किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे आव्हान आहे. चेन्नईने मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अखेरच्या क्षणी ब्राव्होच्या फटकेबाजीमुळे सनसनाटी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या लढतीतही अखेरच्या षटकातील फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताला पराभूत केले होते.दरम्यान सामन्याला सुरवात झाली असून,चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या  दोन्ही सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांच्या मर्यादा प्रतिस्पर्धी संघांनी दाखवून दिल्या होत्या. चेन्नईच्या मधल्या फळीने दोन्ही सामन्यांत निराशा करताना आपल्या विकेटस फेकल्या होत्या. त्यामुळे चेन्नईला या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हींमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. दुसरीकडे पंजाबच्या मधल्या फळीतील फलंदाजांना बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्याने चांगली सुरुवात मिळूनही केवळ 155 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.आज  चेन्नईविरोधात विजय मिळवण्यासाठी  पंजाब उत्सुक असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)