IPL 2018 : नाणेफेक जिंकत किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

मोहाली – या आयपीएलच्या हंगामात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या सनरायजर्स हैदराबाद समोर आज किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं आव्हान आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात झाली असून, किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आज रंगणाऱ्या या लढतीत सलग चौथा विजय मिळविण्यासाठी हैदराबाद संघ उत्सुक असेल.

हैदराबाद संघाने केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली पहिले सलग तीन सामने जिंकून गुणतालिकेत अग्रस्थान मिळविले आहे. प्रामुख्याने गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे  त्यांना ही कामगिरी साधता आली आहे. त्याउलट नवा कर्णधार रविचंद्रन अश्‍विनच्या नेतृत्वाखाली आक्रमक क्रिकेट खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या फलंदाजांनी विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. हैदराबादने तीनही सामने जिंकले असून पंजाबने तीनपैकी दोन सामन्यांत बाजी मारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)