IPL 2018 : धोनीच्या निर्णायक खेळीने चेन्नईचा रोमहर्षक विजय…

बंगळुरू – चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवीत चेन्नईने बंगळुरूवर पाच विकेट्स राखून विजय मिळविला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेले 206 धावांचे आव्हान चेन्नई सुपर किंग्जने यशस्वीपणे  पूर्ण केले.

-Ads-

दर्जेदार खेळाडू संघात असूनही कामगिरीत सातत्य नसल्यामुळे अनेकदा पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आयपीएलच्या अकराव्या हंगामातील आज रंगणाऱ्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे आव्हान होते. दरम्यान चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

ऍब डीव्हिलिअर्सचे वेगवान अर्धशतक आणि डी कॉकच्या साथीत त्याने केलेली झंझावाती शतकी भागीदारी यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 24 व्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी 206 धावांचे आव्हान ठेवता आले होते. परंतु, या खेळीचा काहीही उपयोग झाला नाही.

महेंद्रसिंग धोनीच्या निर्णायक आणि आक्रमक खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघ बंगळुरूवर पाच विकेट्स राखून विजय मिळवू शकला. धोनीने 34 चेंडूमध्ये 7 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 70 धावा बनविल्या. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

 

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)