IPL 2018 : धोनीचा सहभाग अनिश्‍चित? 

महेंद्रसिंग धोनीला झालेली पाठीची दुखापत चांगलीच बळावली असल्यामुळे आयपीएलमधील उरलेल्या सामन्यातील धोनीच्या सहदभागाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनी यांच्या चाहत्यांना मोठा हादरा बसण्याची शक्‍यता आहे. धोनीने या दुखापतीनंतर चेन्नईच्या सरावामध्ये सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे धोनी आगामी सामन्यात खेळणार नसल्याच्या शंकेला दुजोरा मिळाला आहे.

चेन्नईचा सामना उद्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध होत असल्याने सरावासाठी चेन्नईचा संघ गुरुवारी मैदानात उतरला होता. त्यावेळी धोनी मैदानात उपस्थित नव्हता. त्यामुळे धोनीच्या तंदुरुस्तीबाबत चर्चा सुरू झाली. याबाबत संघव्यवस्थापनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण ही स्पर्धा अजून महिनाभर रंगणार आहे. त्यामुळे धोनीची दुखापत गंभीर असेल तर त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. धोनीच्या गैरहजेरीत सुरेश रैनाकडे संघाची धुरा सोपवण्यात येऊ शकते. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध धावांचा पाठलाग करताना धोनीने अखेरच्या षटकापर्यंत पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग केला, मात्र त्याला यश मिळाले नाही. या खेळीतच धोनीच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर धोनीवर मैदानातच वैद्यकीय उपचार करण्यात आले होते.

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)