IPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुसमोर 175 धावांचे लक्ष्य

नवी दिल्ली – नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअर डेव्हिल्सने निर्धारीत 20 षटकात पाच गडी बाद 174 धावा करत बंगळुरू समोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात खराब झाली त्यांचा कर्णधार आणि सलामीवीर गौतम गंभीर केवळ तीन धावा करुन तंबूत परतला त्यामुळे पाच षटकात त्यांना केवळ 22 धावच करता आल्या. पाचव्या षटकात त्यांचा दुसरा सलामीवीर जेसन रॉयही केवळ पाच धावा करुन परतला.

जेसन रॉय बाद झाल्यानंतर आलेल्या रुषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी धडाकेबाज फलंदाजी करताना 8.1 षटकात 75 धावांची भागीदारी करत संघाची धाव संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्रेयसने 31 चेंडूत चार चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावा फटकावल्या. धावांचा वेग वाढवण्याच्या नादात श्रेयस बाद झाल्यानंतर आलेला मॅक्‍सवेलही लागलीच परतल्याने दिल्लीच्या धावगतीला पुन्हा एकदा ब्रेक लागला होता. मात्र रुषभ पंतने धावगती वाढवताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला.

पंतने आपल्या दणकेबाज फटकेबाजीने बंगळुरुच्या तोंडचे पाणी पळवले. त्याने धडाकेबाज फटकेबाजी करत 19 व्या षटकात 18 धावा कुटल्या तर चहालला सलग दोन षटकार लगावले. पंतने 48 चेंडूंत 6 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 85 धावांची तुफानी खेळी साकारली. पंतच्या दिमाखदार खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्रथम फलंदाजी करताना 174 धावा करता आल्या.

संक्षिप्त धावफलक – दिल्ली डेअरडेव्हिल्स – 20 षटकात 5 बाद 174 (श्रेयस अय्यर 52, रिषभ पंत 85, चहाल 22-2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)