मुंबई : आयपीएलच्या अकराव्या हंगामातील आपल्या पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स मैदानात उतरले होते. दरम्यान, मुंबई इंडियन्सने दिलेले १९५ धावांचे मोठे आव्हान दिल्लीने दमदारपणे पेलत आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला आहे.

या विजयाचे खरे  शिल्पकार ठरले ते म्हणजे जेसन रॉय आणि रिषभ पंत…या दोघांच्या खेळीमुळेच दिल्लीने आपला पहिला विजय खेचून आणला. जेसनने  नाबाद ९१ धावा केल्या तर  रिषभ पंत याने ४७ धावा कुटल्या. या दोघांची साथ कृणाल पांड्याने दिली. दरम्यान, दिल्लीने मुंबईवर ७ गडी राखून यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)