IPL 2018 : दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमात संतुलित कामगिरी करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज समोर आज कर्णधार बदलल्या नंतर विजयी मार्गावर परतलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असणार आहे. दरम्यान, आजच्या या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या अकराव्या हंगामात अनेक चढ उतार पाहिलेल्या दिल्लीच्या संघ सध्या गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे. उच्चदर्जाचे गोलंदाज असतानाही दिल्लीला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याची दिल्लीला संधी आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)