IPL 2018 : दिल्लीचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

इंदौर – आयपीएलच्या अकराव्या हंगामात एकामागोमाग एक विजय संपादीत करत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघासमोर आज हंगामात केवळ एक विजय मिळवून गुणतालिकेत अखेरच्या स्थानी असलेल्या दिल्लीचे आव्हान आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली आणि पंजाब यांच्यामध्ये  हा दुसरा सामना असून, पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्लीवर विजय मिळवला होता. दरम्यान आज दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबने एकुण पाच सामने खेळले असून या पाच सामन्यांपैकी पंजाबने 4 सामन्यात विजय मिळवला आहे तर एका सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर दिल्लीने देखील आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)