पुणे : महेंद्रसिंग धोनीची क्रेझ कायम आहे. पुण्यात रंगलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यावेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका तरुणीकडचे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. आयसीसीनेही आपल्या ट्विटर हँडलवरून त्या तरुणीचा फोटो पोस्ट करून धोनीच्या लोकप्रियतेला दाद दिली आहे.
‘भविष्यातील जोडीदाराने मला माफ करावे, कारण एम. एस. धोनी हेच माझे पहिले प्रेम राहणार आहे’ असा संदेश लिहिलेलं हे पोस्टर ही तरुणी सतत हात उंचावून दाखवत होती. अनेक कॅमेऱ्यांनी हा फोटो टिपला. हा फोटो सोशल मीडियातही वेगाने व्हायरल होत आहे.
? @msdhoni ?#CSKvRR #IPL2018 pic.twitter.com/j2t5Scuwzs
— ICC (@ICC) April 20, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0