IPL 2018: चेन्नई सुपरकिंग्जचा 4 धावांनी विजय​​​​​​​

हैदराबाद :  आयपीएलमध्ये आज झालेल्या रंगतदार लढतीत चेन्नई सुपरकिंग्जचा ४ धावांनी विजय झाला आहे. दरम्यान, हैदराबादच्या केन विल्यम्सनची एकाकी झुंज अपयशी ठरली. चेन्नईने दिलेल्या १८३ धावांचे आव्हान हैदराबादला पेलता आले नाही आणि हैदराबादचा संघ २० षटकात केवळ १७९ च धावा काढू शकला.

दरम्यान, चेन्नईने दिलेले १८३ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी रिकी भुई आणि कर्णधार केन विल्यम्सनने हैदराबादकडून  डावाची सुरुवात केली. मात्र दिपक चहरने पहिले षटक निर्धाव टाकताना हैदाराबदला एक धक्काही दिला. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रिकी भुईला वॉटसनकरवी  झेलबाद केले.  दिपक चहरने रिकी भुईनंतर मनिष पांडेला 00 धावांवर बाद करत चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली. 3 षटकानंतर हैदराबादने दोन बाद 11 धावा केल्या.

दिपक चहारने आपल्या तीन षटकांमध्ये सात धावा देत हैदराबादच्या तीन फलंदजांना तंबूत धाडले. मनिष पांडे, रिकी भूई आणि दिपक हुड्डाला त्याने स्वस्तात केले बाद. हैदराबादच्या पाच षटकानंतर तीन बाद 28 धावा झाल्या होत्या. कर्णधार केन विल्यम्सनने शकिब अल हसनच्या साथीने हैदराबादचा डाव सावरला. नवव्या षटकाअखेर हैदराबादच्या 3 बाद 60 धावा झाल्या. दरम्यान, शाकिब अल हसन 24 धावा काढून बाद झाला.

कर्ण शर्माने सुरेश रैनाकरवी झेलबाद केले. तर 13 षटकानंतर हैदराबादच्या चार बाद 84 धावा झाल्या होत्या आणि  विजयासाठी 42 चेंडूत 99 धावांची गरज होती. केन विल्यम्सनने 51 चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकरांसह 84 धावांची खेळी केली. मात्र ब्राव्होने केन विल्यम्सनला 84 धावांवर जाडेजाकरवी झेलबाद केले. दरम्यान, केन विल्यम्सनची ही झुंज अपयशी ठरली आणि हैदराबादच्या पदरी अपयश आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)