IPL 2018 : चेन्नईच्या विजयात रायुडूचा मोलाचा वाटा

प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचे प्रशंसोद्‌गार

बंगळुरू  – चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या सामन्यात बंगळुरूने दिलेले 206 धावांचे आव्हान धोनी आणि रायुडूने तुफान फटकेबाजी करत सहज पार केले. यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र धोनीच्या खेळाचे कौतुक करण्यात आले. मात्र चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी अंबाती रायुडूच्या खेळाचे कौतुक करून चेन्नईच्या विजयात त्याचाही वाटाही मोलाचा असल्याचे मान्य केले आहे.

-Ads-

धोनीने ज्या पद्धतीने खेळला आहे, ते पाहता प्रसारमाध्यमे त्याचे कौतुक करणार हे निश्‍चितच होते. मात्र रायुडूनेही तितकीच प्रशंसनीय कामगिरी केली आहे, असे सांगून फ्लेमिंग म्हणाले की, प्रत्येक खेळपट्टीवर रायुडू सातत्याने चांगली खेळी करतो आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाचा तो अविभाज्य हिस्सा बनलेला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना फ्लेमिंग यांनी अंबाती रायडूच्या खेळीचे तोंड भरून कौतुक केले.

रायुडूच्या फटक्‍यांमध्ये खूप ताकद आहे. दुर्दैवाने त्याच्या प्रतिभेला हवा तसा वाव मिळाला नाही. मात्र चेन्नईसाठी त्याने जी काही खेळी केली आहे, ती पाहता आमच्यासाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे. तसेच रायुडूने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची तयारी दाखविली आहे आणि क्रम बदलल्यानंतरही चमकदार कामगिरी करून दाखविली आहे.परंतु आवडत्या क्रमांकावर खेळताना त्याचा आत्मविश्‍वास अधिकच जाणवतो. बंगळुरूच्या इतर खेळाडूंनीही रायडूला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रायडू सध्या चांगल्या लयीत आहे. एक प्रशिक्षक म्हणून आपल्याला याचा नक्‍कीच आनंद असल्याचेही फ्लेमिंगने स्पष्ट केले.

धोनीच्या चपळाईमुळे बंगळुरूला ब्रेक

कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपण अजूनही उत्तम मॅच फिनिशर असल्याचे धोनीने या सामन्यातून दाखवून दिले. फक्त फलंदाजीतच नव्हे यष्टीपाठीही चमकदार कामगिरी करुन धोनीने सामन्याचा नूर पालटून टाकला. एका टोकाकडून ऍब डीव्हिलिर्सची दमदार फलंदाजी सुरू असताना बंगळुरूची मोठया धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू होती. पण डावाच्या शेवटच्या षटकात लागोपाठ विकेट गमावल्यामुळे आरसीबीला 205 धावांचीच मजल मारता आली. शेवटच्या क्षणाला धोनीने चापल्य दाखवत दोन फलंदाजांना धावबाद केले. त्यामुळे बंगळुरूच्या धावगतीला काहीसा ब्रेक लागला. ज्याचा परिणाम सामन्यावर झाला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)