IPL 2018 : चेन्नईकडून हैदराबादला 183 धावांचे आव्हान

हैदराबाद:  अंबाती रायुडू, सुरेश रैना आणि कर्णधार एम.एस. धोनी यांच्या तुफान फटकेबाजीच्या जौरावर चेन्नई संघाने निर्धारित 20 षटकांत तीन बाद 182 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादला आता विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्या दहा षटकांत हैदराबादच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फंलदाजांना धावा काढण्यापासून रोखले.

चेन्नईच्या गेल्या सामन्यात शतकी खेळी करुन विजयात मोलाची भूमिका बजावाणाऱ्या वॉटसनला भुवनेश्वरकुमारने स्वस्तात बाद केले. बॉटसनने 15 चेंडूत फक्त 9 धावा करता आल्या. दुसरा सलामिवीर फाफ डु प्‍लेसिलसाही फारशी चमक दाखता आला नाही. फाफ डु प्‍लेसिसही 13 चेंडूत 11 धावांवर बाद झाला. पहिल्या दहा षटकांत चेन्नईला फक्त 54 धावा करता आल्या. चौथ्या स्थानावर आलेल्या रायुडूने सर्व सुत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी केली

रैनाने संयमी खेळी करत संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसरीकडे रायुडूने षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली. रायुडूने 37 चेंडूत 9 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी साकारली. शतकाकडे कूच करणारा रायुडू धावबाद झाला.  रायुडू बाद झाल्यानंतर धोनीने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली.

धोनीने 12 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. अनुभवी रैनाने आज संयमी फंलदाजी केली. रैनाने  43 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकांरासह 53 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)