IPL 2018 : गौतम गंभीर बाबत श्रेयस अय्यरने केला खुलासा

नवी दिल्ली – दिल्ली डेअरडेव्हिल्सने शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय मिळवला. पण या संघामध्ये गौतम गंभीर नव्हता. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. तडकाफडकी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद सोडल्यानंतर पुढच्याच सामन्यात गंभीर खेळला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र या बाबत नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यरने याबाबत खुलासा केला आहे.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अय्यर म्हणाला कि, गंभीरने स्वत:हून संघाबाहेर बसून त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याचा निर्णय घेतला. मी गंभीरला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला नाही. तो त्याचा स्वत:चा निर्णय होता. खरोखरच हा खूप मोठा निर्णय होता. त्याच्याबद्दल मनात असलेला आदर आता आणखी वाढला आहे.

गंभीरच्या जागी कॉलिन मुनरोला संधी देण्यात आली. त्याने 18 चेंडूत 33 धावा फटकावून दमदार सुरुवात करुन दिली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने कोलकाता नाइट रायडर्सला 55 धावांनी नमवून पराभवाची मालिका संपवली. दिल्लीकडून खेळणारे मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने 220 धावांचं तगडं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं.

 आपल्या “ऍटीट्यूड’ मुळे गंभीर संघाबाहेर – संदीप पाटील

“द क्विंट’ या वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या लेखामध्ये संदीप पाटील यांनी म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी गौतम गंभीरचं भारतीय संघातलं स्थान अबाधित होतं. मात्र मध्यंतरीच्या काळात गौतमची कामगिरी ढासळलेली असताना, मी निवड समितीचा अध्यक्ष या नात्याने शिखर धवन आणि मुरली विजयला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला.

यानंतर मुरली विजयने कसोटी संघात सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आणि गौतमचे भारतीय संघातले दरवाजे बंद झाले. या घटनेनंतर गौतमने आमच्यातली मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेनंतर आम्ही जेव्हा कधी भेटलो तेव्हा केवळ औपचारिकता म्हणून तो माझ्याशी बोलतो किंवा हसतो. गंभीरला संघात जागा न मिळण्याबद्दल पाटील यांनी आपलं मत मांडलं.

गंभीरने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर संघातील सलामीवीराची जागा मिळवली होती. तो नेहमीच क्रिकेटचा विचार करायचा. “ऍटीट्यूड’ मुळेच त्याने संघातील आपले स्थान पक्के केले होते. महेंद्रसिंग धोनीनंतर गंभीर हा संघातील महत्वाचा खेळाडू होता. पण आपल्या “ऍटीट्यूड’ मुळे त्याने संघातील स्थान गमावले होते. त्याने जर धावा केल्या असत्या आणि चांगला व्यवहार केला असता तर त्याच्या संघातील स्थानाला धोका पोहाचला नसता.

भारतीय संघातील “ऍटीट्यूड’ गंभीरमध्ये अजूनही आहे. त्यामुळेच कर्णधारपद सोडल्यावर त्याने संघातील स्थानही नाकारले. दिल्लीने त्याला करारानुसार दिलेले पैसेही त्याने परत करणार असल्याचे सांगितले. एकंदरीत “ऍटीट्यूड’ मुळे सध्या गंभीर क्रिकेट सोडण्याचा मार्गावर आहे, असेही ते यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)