IPL 2018 : गौतमची खेळी संस्मरणीय – संजू सॅमसन

जयपूर  – सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या कृष्णप्पा गौतमने 11 चेंडूंत नाबाद 33 धावांची धडाकेबाज खेळी करताना मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला. गौतमच्या खेळीमुळे मुंबईने दिलेले 168 धावांचे आव्हान सहज पार करताना राजस्थानने तीन गडी राखून रोमांचकारी विजयाची नोंद केली. त्याच्या या खेळीवर राजस्थान संघातील सहकारी संजू सॅमसनने स्तुतीसुमने उधळली आहेत.

सामन्यानंतर बोलताना सॅमसन म्हणाला की, गौतमची ही खेळी त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी ही वेगळाच अनुभव देणारी होती. किंबहुना त्याची ही खेळी आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही. गौतमने सामन्यात खेळताना मुंबईच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले, त्याने बुमराहच्या षटकात केलेल्या फटतकेबाजीचे कौतुक करावे तितके कमी असल्याचेही सॅमसनने सांगितले.

या सामन्यात गौतमला सामनावीर पुरस्कार मिळायला हवा होता, असे मत अनेकांनी व्यक्‍त केले. परंतु सॅमसन म्हणाला की, जेव्हा आपण सामना खेळत असतो त्यावेळी सर्वांची खेळी महत्वाची असते. जोफ्रा आर्चरने महत्त्वाच्या वेळी घेतलेल्या बळींमुळे 200 धावांकडे वाटचाल करणाऱ्या मुंबईला आम्हाला 167 धावांतच रोखण्यात यश आले. त्यामुळे त्याची कामगिरीही मोलाची होती. तसेच गौतमने निर्णायक क्षणी केलेल्या कामगिरीमुळेच आम्ही सामना जिंकला. सामनावीर पुरस्कार कोणाला मिलाला, हे फारसे महत्त्वाचे नाही.

राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणे आपल्या सहकाऱ्याच्या या खेळीवर भलताच खूष झाला. सामन्याचा निकाल लागल्यानंतरही मला काही वेळ त्यावर विश्वास बसत नव्हता, असे सांगून रहाणे म्हणाला की, 14 व्या षटकानंतर आमच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केल्यामुळे हा विजय मिळवणे शक्‍य झाले. नाहीतर मुंबईची धावसंख्या 190-200 च्या घरात गेली असती. मात्र गौतमने केलेली खेळी ही खरोखरीच अविश्वसनीय होती. आमच्याकडे अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत माझे एक मन हा सामना आम्ही जिंकू असे सांगत होते.

 ईशान किशननेही केले कौतुक

मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशननेही गौतमच्या खेळीचे कौतुक केले. ईशान म्हणाला की, गौतमच्या फलंदाजीने आमच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. त्याने उत्कृष्ट टेम्परामेंटचे आणि दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याने उगाचच प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने खराब चेंडूची वाट पाहिली आणि योग्य टिकाणी फटके लगावले.

त्याच बरोबर जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीबद्दल किशन म्हणाला की आर्चरने आमचे तीन महत्त्वाचे फलंदाज एकाच षटकांत बाद केले. त्यामुळे एकवेळ आम्ही दोनशेची मजल मारू, असे वाटत असताना आमचा डाव केवळ 167 धावांवर रोखला गेला. खऱ्या अर्थाने राजस्थानने त्याच वेळी विजयाचा पाया रचला. त्यामुळे आर्चरलाही राजस्थानच्या विजयाचे श्रेय देणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)