IPL 2018 : गेलच्या शतकामुळे पंजाब तीन बाद 193

चंडीगड – धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलचे झंझावाती शतक आणि त्याला अन्य फलंदाजांनी दिलेली साथ यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 16व्या साखळी सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला सनरायजर्स हैदराबाद संघासमोर विजयासाठी 194 धावांचे आव्हान ठेवता आले.

नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या पंजाबने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 193 धावा फटकावल्या. गेलने 63 चेंडूंत 1 चौकार व 11 षटकारांसह नाबाद 104 धावा फटकावल्या. त्याने प्रथम लोकेश राहुलच्या साथीत पंजाबला 7.5 षटकांत 53 धावांची सलामी दिली. राहुलने 21 चेंडूंत 3 चौकारांसह 18 धावा केल्या.

गेलने आपली कामगिरी कायम राखताना दुसऱ्या विकेटसाठी मयंक आगरवालच्या साथीत 30 धावांची भर घालताना पंजाबची आगेकूच कायम राखली. मयंकने 18 धावा केल्या. त्यानंतर गेलने तिसऱ्या विकेटसाठी करुण नायरच्या साथीत 7.2 षटकांत 85 धावांची झंझावाती भागीदारी करीत पंजाबला सुस्थितीत नेले. नायरने 21 चेंडूंत 3 चौकार व 1  षटकारासह 31 धावांची खेळी केली. ऍरॉन फिंचने केवळ 6 चेंडूंत 1 चौकार व 1 षटकारासह नाबाद 14 धावांची उपयुक्‍त खेळी केली.

संक्षिप्त धावफलक-

किंग्ज इलेव्हन पंजाब- 20 षटकांत 3 बाद 193 (ख्रिस गेल नाबाद 104, करुण नायर 31, लोकेश राहुल 18, मयंक आगरवाल 18, ऍरॉन फिंच नाबाद 14, भुवनेश्‍वर 25-1, सिद्धार्थ कौल 33-1)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)