IPL 2018 : कोलकाता समोर आज दिल्लीचे आव्हान 

जेसन रॉय आणि आंद्रे रसेलच्या खेळीकडे विशेष लक्ष 

कोलकाता – आयपीएलच्या अकराव्या हंगामात विजयाने सुरुवात केल्या नंतर लागोपाठ दोन पराभवांना सामोरे गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघासमोर आज मुंबई इंडियन्स सोबतच्या सामन्यात विजय मिळवत हंगामातील पहिला विजय मिळवणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असणार आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामाची सुरुवात बंगळुरू सारख्या तगड्या संघासोबतच्या सामन्यात एकतर्फी विजय साकारुन करणाऱ्या कोलकाताला पुढील दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने दिनेश कार्तिकच्या कर्णधारपदाचे कौशल्य पणाला लागले आहे.

-Ads-

पराभव झालेल्या दोन्ही सामन्यात कार्तिकला कर्णधारपदाचा अनुभव नसल्याचा तोटा कोलकाताला झाला आहे. कारण चेन्नई विरोधातील सामन्यात संघ निवडताना कार्तिकने चूक करत फॉर्मात नसलेल्या विनय कुमारला संघात घेतले आणि महत्वाच्या षटकासाठी त्याला गोलंदाजी दिली,  त्यामुळे शेवटच्या षटकात नो बॉल वर षटकार देत त्याने संघाला पराभवाच्या खाईत लोटले.  तर दुसऱ्या सामन्यात समतोल संघ निवडल्या नंतरही खेळाडूंच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या क्रमवारी मध्ये बदल केल्याने कोलकाताला पराभवाला सामोरे जावे लागले. संघासाठी यशस्वी सलामी देणाऱ्या सुनिल नारायणच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केला. तर 19 वर्षाखालील विश्‍वचषकात तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलला सहाव्या स्थानावर फलंदाजीला पाठवून त्याने आपल्यातील अनुभवाची कमी दाखवून दिली होती.

तर दुसरीकडे चालु हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे गेलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने मुंबई विरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ठ फलंदाजीचे प्रदर्षन करताना विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्लीचा संघ विजयाची लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल तर कोलकाता पुन्हा विजयी मार्गावर परतण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ – 

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रीस लीन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितिश राना, सुनिल नरेन, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिचेल जॉनसन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकु सिंग, कॅमेरोन डेलपोर्ट, जावोन सीरलेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी, टॉम कुरन.

दिल्ली डेअरडेव्हिल्स – गौतम गंभीर (कर्णधार), रिशभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्‍सवेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, शहाबाज नदीम, विजय शंकर, राहुल टवेटीया, मोहोम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुन्रो, डॅनिअल ख्रिच्शन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरत सिंग मान, अवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्शल पटेल, मन्जोत कालरा, संदीप लामिचाने, सयन घोश.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)