IPL 2018 : कोलकाता नाईट रायडर्स 6 गडी राखून विजयी…

बंगळुरू  – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होत असलेल्या महत्त्वपूर्ण लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या झंजावती नाबाद 68 धावांच्या जोरावर बंगळुरूने निर्धारीत 20 षटकात 4 गडी गमावत 175 धावा करत कोलकाता समोर विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले होते.

नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूने आज सावध सुरुवात केली. त्यामुळे पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांअखेरीच बंगळुरूच्या बिनबाद 40 धावा झाल्या होत्या. परंतु, या सावध खेळीचा बंगळुरूला काहीही फायदा झाला नाही.

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरवीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6 गडी राखून पराभूत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)