IPL 2018 : कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय 

जयपूर : राजस्थान रॉयल्स संघा समोर आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील पुढच्या साखळी सामन्यात बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्स संघाचे आव्हान आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत समतोल कामगिरी करताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचलेल्या बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्स संघालाच या लढतीत विजयासाठी पसंती देण्यात आली आहे. दरम्यान कोलकाताच्या कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

मालीकेत कोलकाताकडे ख्रिस लिन आणि सुनील नारायण हे स्फोटक कामगिरी करू शकणारे सलामीवीर आहेत. मधल्या फळीत नितीश राणा, रॉबिन उथप्पा दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यां सारखे कोणत्याही क्षणी सामना फिरवणारे फलंदाज आहेत, तर गोलंदाजांमध्ये 19 वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धेत भारताकडून प्रभावी कामगिरी करणारा जलदगती गोलंदाज शिवम मावी आहे. तसेच आपल्या जादूई फिरकीवर भल्याभल्यांना नाचवणारे कुलदीप यादव, सुनील नारायण, पियुष चावला यांसारखे गोलंदाजही आहेत. त्यामुळे त्यांचा संघ या मोसमात सर्वात समतोल संघ समजला जातो.

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)