IPL 2018 : कोलकाताचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

बंगळुरू –  दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या अनपेक्षित पराभवामुळे आत्मविश्‍वासाला हादरा बसलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि अग्रस्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सनसनाटी पराभवातून सावरण्यासाठी उत्सुक असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ यांच्यात आयपीएल टी-20 स्पर्धेतील महत्त्वाची लढत आज रंगणार आहे. दरम्यान कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-

घरच्या मैदानावर होणाऱ्या या लढतीत विजय मिळवून पुनरागमन करण्यासाठी बंगळुरू संघ सज्ज झाला आहे. परंतु चेन्नईच्या धक्‍क्‍यातून बंगळुरूचे खेळाडू कितपत सावरले आहेत, याची कसोटीच सामन्यात लागणार आहे. त्याच वेळी तळाच्या स्थानावर असलेल्या दिल्लीकडून पत्कराव्या लागलेला पराभव विसरून विजयपथावर परतण्यासाठी कोलकाताचे खेळाडू उत्सुक आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)