नवी दिल्ली : 2019 साली आयपीएलच्या बाराव्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावाची तारीख ठरल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले असून 18 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता हा लिलाव पार पडला जाणार आहे.
या लिलावाची जागा अजुन निश्चीत करण्यात आलेली नसली, तरीही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरमध्ये हा सोहळा रंगण्याची शक्यता वर्तवली आहे.
सर्वसाधारणपणे आयपीएलच्या लिलावाला सकाळी 10 वाजता सुरुवात होते. मात्र प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळावा यासाठी आगामी हंगामाचा लिलाव हा दुपारी 3 वाजता ठेवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. 3 वाजता सुरु होणारा लिलाव हा रात्री साडे नऊ वाजता संपेल, अशी सुचना सर्व संघमालकांना देण्यात आली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
1
0