महामार्गावरील दुभाजक देतोयं अपघाताला निमंत्रण

दिशादर्शक फलकाचा वाहनधारकांना अडथळा, दुचाकींच्या अपघातात वाढ
कवठे – भुईंज येथे महामार्गावर उड्डाणपुल बांधत असताना महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्याने वळविण्यात आली होती. यावेळी वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक वळविल्याचे दिशादर्शक फलकही लावण्यात आले होते. पुल सुरु झाल्यानंतरही हे फलक काढले नसल्याने सध्या हे फलक वाहनधारकांना अडथळा ठरु लागली असून यामुळे किरकोळ अपघातही घडू लागली आहे.

बदेवाडी (ता. वाई) येथील उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने गेले कित्येक महिने पुणे सातारा लेनवरून सुरु असणारी वाहतूक ही सेवारस्त्यावरून वळविण्यात आली होती. हीच वहातुक पुन्हा भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर पुणे सातारा लेनवर मुख्य महामार्गावर वळविण्यात आलेली होती. वाहनांना दिशा दाखविण्यासाठी दोन आडवी पत्र्याची पाने काळ्या रंगाने रंगविली असून यावर पांढऱ्या रंगाने दिशादर्शक बाण दाखविण्यात आलेले आहेत व तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याच्या तीन मोठ्या बॅरलमध्ये हे दिशादर्शक लाकडी खांबांच्या सहाय्याने उभे करण्यात आलेले आहेत. हा भला मोठा दिशादर्शक फलक सेवारस्त्याचा निम्मा भागावर लावण्यात आला असून उरलेल्या निम्म्या भागातून भुईंज या ठिकाणी जाणारी सर्व वाहने ये-जा करीत आहेत.

-Ads-

उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत सेवारस्त्यावरूनच सर्व वाहतूक सुरु असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील दिशादर्शक लावणे गरजेचे होते. सदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होवून कित्येक दिवसापूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून यावरून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आलेली आहे. भुईंज गावाला मोठी बाजारपेठ असल्याने येथे खूप मोठ्या प्रमाणात लोकांची व वाहनांची वर्दळ असते. देगाव, मापरवाडी, लगडवाडी, किकली, जांब, चाहूर, वाखणवाडी तसेच बदेवाडी येथील लोकांना या ठिकाणाहून याच सेवारस्त्याचा वापर करावा लागत आहे तसेच किसन वीर सहकारी साखर कारखान्याकडे जाण्यासाठी वाई परिसरातील सर्वच गावातील लोकांना व पुणे लेनवरील सर्वच वाहनांना याच सेवारस्त्याने जावे लागत असल्याने सदर सेवारस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते. महामार्गावरून भुईंज गावाकडे जाण्यासाठी याच दिशादर्शक फलकाला वळसा घालून जावे लागत असल्याने व दिशादर्शक फलक हा सेवा रस्त्यावरच उभा केला असल्याने व सेवारस्त्याचा निम्मा भाग या दिशादर्शक फलकाने व्यापल्याने तसेच मोठ्या पत्र्याच्या दोन आडव्या पानांचा वापर असलेल्या या दिशादर्शकाने भुईंज बाजूकडून बदेवाडी गावाकडे सेवारस्त्याने येणारी छोटी वाहने व दुचाकी या पुणे सातारा लेनवरून कारखान्याकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनांना दिशादर्शक फलकाच्या पत्र्याच्यामुळे दिसत नसल्याने या अरुंद भागात अचानक दोन्ही दिशेची वाहने समोरासमोर येवून अपघात घडत आहेत. हे अपघात किरकोळ स्वरूपाचे असले तरी ते नित्याचेच घडत असल्याने याचा त्रास मात्र अपघातग्रस्त वाहनचालकांना दुखापत होण्यात व वाहनांचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरत आहे व यासाठी निव्वळ हा दिशादर्शक फलकच जबाबदार असून वाहनचालकांच्यामधून सदर दिशादर्शक फलक हटविण्याची मागणी होत आहे.

\

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)