धोकादायक चेंबर देतोय मृत्यूस निमंत्रण

महाबळेश्‍वर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

महाबळेश्‍वर  – हागणदारी मुक्‍त होवून ओडीएफ प्लस नामांकन मिळविण्यासाठी पालिकेने एकीकडे प्रयत्न सुरू केले असतानाच दुसरीकडे पालिकेच्या हलगर्जीपणाचा कळस झाल्याचे चित्र पुढे आले आहे. रहदारीच्या रस्त्यावरील चेंबरमधून सांडपाणी रस्त्यावरून जंगलात जावुन प्रदुषणात वाढ करीत आहेच. पण, या उघडया चेंबरमुळे पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या चेंबरमध्ये पडून एखादी दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदारी घेणार का? असा सवाल केला जात आहे.

महाबळेश्‍वर शहरात असे अनेक चेंबर आहेत जी वर्षभर कायम वाहत असतात. पर्यटकाच्या गर्दीच्या हंगामात तर अनेक चेंबर भरून वहात असतात. यामध्ये साकेत प्लाझा रस्त्यावरील धोकादायक स्थितीत असलेला चेंबर देखील आहे. हा चेंबर मधुन सांडपाणी रस्त्यावरून जंगलात गेलेले दिसत आहे. तर हा चेंबर पादचारी यांचेसाठी मृत्युचा सापळा ठरत असून पालिकेच्या हलगर्जीपणामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडुन पादचारी दुचाकीस्वार यांचा जीव जावु शकतो.

साकेत प्लाझाप्रमाणेच वीज वितरण कार्यालयासमोर असलेला चेंबर मधूनही कायम सांडपाणी रस्त्यावर येते. नामदेव अंबिका सोसायटी मधील चेंबरही कायम वाहत असते. पावसाळ्यात या चेंबर मधून सांडपाणी व मैला रस्त्यावरून वहात असतो. या चेंबर बाबत आज झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक संजय पिसाळ सभागृहाचे व मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले. तरी गेली आठ महिन्यांपासून या चेंबरचे काम होत नाही.

जर खाजगी ठेकेदार हे काम करीत नसेल तर त्यांची तातडीने बदली करावी व नविन ठेकेदाराची नेमणूक करावी, अशी मागणी केली. या मागणीला नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच हे काम पुर्ण होईल अशी ग्वाही दिली. परंतु, आज साकेतप्लाझा रस्त्यावरील धोकादायक चेंबरकडे पालिका केव्हा लक्ष देणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान आज झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील सांडपाणी व कचरा व्यवस्थापन मजबुत करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, किसनराव शिंदे, रविंद्र कुंभारदरे, संदीप साळुंखे, विमलताई पार्टे, नासिर मुलाणी, शारदा ढाणक, विमल ओंबळे आदी नगरसेवकांनी केली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)